नाशिक जिल्ह्यात निफाड,सिन्नर ,दिंडोरी तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ

सद्यस्थितीत १४ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरू : जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख १६ हजार २०२ रुग्ण कोरोनामुक्त

0

नाशिक – नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर वाढत असून जिल्ह्यातील तीन तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात प्रामुख्याने निफाड ,सिन्नर आणि दिंडोरीचा समावेश आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी अनेकांना सौम्य लक्षणे आहेत.कालच एकदिवसात जिल्ह्यात २९९९ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी १९१६ रुग्ण नाशिक महापालिका हद्दीत आढळले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार २०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १४ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५८०, बागलाण १२२, चांदवड १२८, देवळा ११३, दिंडोरी २८५, इगतपुरी २३५, कळवण १०२, मालेगाव १२०, नांदगाव १६६, निफाड ६९४, पेठ ४३, सिन्नर ३६२, सुरगाणा ५२, त्र्यंबकेश्वर १७१, येवला १९७ असे एकूण ३ हजार ३७० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १० हजार १६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९१ तर जिल्ह्याबाहेरील २७३ रुग्ण असून असे एकूण १४ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३९ हजार ०७८ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १३५, बागलाण ३१, चांदवड ३२, देवळा ३१, दिंडोरी ६१, इगतपुरी ३८, कळवण ५०, मालेगाव १९, नांदगाव ५२, निफाड २०६, पेठ १०, सिन्नर १०४, सुरगाणा २०, त्र्यंबकेश्वर ४०, येवला ३९ असे एकूण ८६८ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९५.३७ टक्के, नाशिक शहरात ९४.३३ टक्के, मालेगाव मध्ये ९५.०९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.४१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४ हजार २५४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७७३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

४ लाख ३९ हजार ०७८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख १६ हजार २०२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १४ हजार १०३ पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.