सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात शरण गेले असून,न्यायालायने नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आज दुपारी नितेश राणे कोर्टासमोर शरण आले होते. नितेश राणे यांची वैद्यकीय चाचणी नंतर त्याची कणकवली पोलीसस्टेशन च्या कोठडीत रवांगी होणार आहे. आता पोलिस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. आता नितेश राणे ४ फेब्रुवारीनंतर नितेश राणे जामीनासाठी अर्ज करु शकतात. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा गंभीर आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष असलेल्या सतिश सावंत यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक असल्याचं समोर आलं होतं.
नितेश राणेंवर आरोप करण्यात आल्यानंतर अनेक दिवस नितेश राणे हे अज्ञातवासात होते. आधी जिल्हा सत्र न्यायालयाननं, त्यानंतर हायकोर्टानं आणि मग सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीनाबाबत दिलासा दिलेला नव्हता. अखेर आता न्यायलयानं नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली