Nashik : जिल्ह्यात कोरोनाचे ६६७ रुग्ण  तर २३५० कोरोना मुक्त : ५ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात : शहरात २९२ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ५१५१ : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ %

0

नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ६६७ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या २९२ झाली तर जिल्ह्यात आज २३५० जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १३७८ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज  ९७.०३ % झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०३ ,मालेगाव महापालिका हद्दीत १ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २९२ तर ग्रामीण भागात ३३९ मालेगाव मनपा विभागात ११ तर बाह्य २५ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  ९७.२४ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ५१५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ३४१६ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  –
नाशिक शहरात ९७.२४ %, नाशिक ग्रामीण मधे ९६.६८ %, मालेगाव मध्ये ९६.८६ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.७९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-५

नाशिक महानगरपालिका- ०३

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८८४१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०७५

सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १९

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३५२१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १२

४) मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७०

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१५२९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १३७८

आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण

लक्षणे असलेले रुग्ण  – १०९९

लक्षणे नसलेले रुग्ण – ४०५२

ऑक्सिजन वरील रुग्ण  – १२९

 

व्हेंटिलेटर वरील रुग्ण  – २३


नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthanonline.com/wp-content/uploads/2022/02/AGE-SEX-TEMPLATE-POSITIVE-05-FEB-22.pdf

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!