Nashik : रांगोळीच्या माध्यमातून  लतादिदीनां अनोखी श्रद्धांजली  

0

नाशिक – लतादीदींच्या जाण्याने सर्वत्र शोक पसरला आहे,लतादीदींबद्दल भावना व्यक्त करत नाशिकच्या पूजा बेलोकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून ५ X ५ फुटांचे पोर्टेट साकारून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी पूजाला आठ तासांचा कालावधी लागला, त्यात लतादीदींची पूर्वीची छबी आणि आत्ताचीही छबी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बाजूला रांगोळीनेच दिवा लावून त्यांना आदरांजली ही वाहिली आहे, त्याच दिव्याच्या शांत ज्योत मधून स्वर बाहेर पडताना दाखवले आहेत, आणि वर त्यांनीच गायलेली गाण्याची ‘ तुम मुझे यु भुला ना पाओगे…ही ओळ लिहिली आहे.

रांगोळीबद्दल बोलतांना पूजा म्हणाली रांगोळीची आवड लहानपणापासूनच, माझ्या आईकडून मिळालेला वारसा..या रांगोळी ची कल्पना माझ्या आईनेच दिली, म्हणजे रांगोळीची ठेवण कशी असायला हवी आणि त्यात कोणते शब्दस्वर असायला हवे ही सगळी कल्पना आईनेच  सुचवली…सद्ध्या मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते, अनेक मराठी सीरिअल ऍक्टर्स चे मेकअप केले आहेत, आणि सर्व प्रकारच्या म्हणजे फुलांच्या रांगोळ्या, सप्तपदी, संस्कारभारती रांगोळी, पोर्टेट रांगोळीच्या ऑर्डर्स घेते. गणपती च्या दिवसांत शाडू गणपती कार्यशाळा घेत असते.

Nashik - A unique tribute to Latadidi through Rangoli

मी लहान असताना माझी आई फ्रीहॅन्ड पोर्ट्रेट काढायची ग्राफ्स चा वापर न करता…मला फार कुतूहल असायचं की आईसारखं मला पण येईल का? आईने माझी आवड ओळखली आणि योग्य मार्गदर्शन करून मला या कलेत घडवलं.. आत्ताही मला माझ्या आईकडून रांगोळी साकारण्यात खूप साथ मिळते, की रांगोळीची रचना कशी असावी , बरीचशी कल्पकता आईचीच असते.

ही रांगोळी नवीन नाशिकच्या सावतानगर परिसरात साकारली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!