अहमदाबाद – २००८ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील ४९ दोषींपैकी ३८ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.सरकारी आकडेवारीनुसार, या बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांनी आपला जीव गमवावा लागला होता आणि २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
८ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. तर २८ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी १३ वर्षांपासून विशेष न्यायालयात सुरु होती.आज विशेष न्यायालयाने ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी सर्व ४९ दोषींना UAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने ४९ जणांनाच दोषी ठरवलं होतं तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.
या दोषींच्या शिक्षेच्या कालावधीबाबत सोमवारी सरकारी विकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर आज न्यायालयाने ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.गुजरातच्या अहमदाबादमध्ये जुलै २००८ मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरण म्हणजे, २६ जुलै २००८ अवघ्या देशासाठी काळा दिवस त्या दिवशी अहमदाबादमध्ये नेहमीप्रमाणे बाजारपेठांमध्ये लगबग सुरु होती,
मात्र त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता मणिनगर येथील गजबजलेल्या बाजारपेठेत अचानक स्फोट झाला. त्यानंतर ७० मिनिटांतच अहमदाबादमध्ये तब्बल २१ बॉम्बस्फोट झाले होते संपूर्ण अहमदाबाद हादरलं.२००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीननं हे स्फोट घडवून आणले होते. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा विधानसभा मतदारसंघ होता.मणिनगरमधून दोन जिवंत बॉम्ब पोलिसांनी जप्त केले होते. तर मणिनगरमध्ये तीन ठिकाणी स्फोट झाले होते.
A special court in Gujarat pronounced the death sentence to 38 out of 49 convicts in the 2008 Ahmedabad serial bomb blast case. Eleven others have been sentenced to life imprisonment by the court, the special public prosecutor Amit Patel said pic.twitter.com/3zpjSFeQBY
— ANI (@ANI) February 18, 2022