मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी आज सकाळी ७:४५ वाजता ईडी कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर ईडीने चौकशी केल्या नंतर त्यांना दुपारी अटक केली.नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर केले असता न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी दिली आहे.ईडीने न्यायालयाकडे १४ दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली होती. ईडीच्या कस्टडीच्या काळात नवाब मलिक यांना औषधे आणि त्यांच्या घरातून जेवण मिळावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पहाटेच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी सातवाजेपासून चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास अटक केली. अटक केल्यानंतर मलिक यांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीनं याआधीच ताब्यात घेतलं आहे. या चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली. नवाब मलिक यांच्या भावाला काल ईडीने समन्स पाठवल होत. त्यानंतर आज पहाटे नवाब मलिक यांच्या कुर्ला या निवासस्थानी ईडीचे अधिकारी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान पोहचले. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सकाळी 7 ते ७.३० वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसोबत घरातून निघाले.