नाशिक-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाशिक शहर भाजपाच्यावतीने भाजपा कार्यालय वसंतस्मृतीच्या बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. बॉम्बस्फोटातील ओरीपींशी आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी राष्ट्रविरोधी काम केले आहे.
आघाडी सरकार आरोप करून ईडी ला बदनाम करत आहे. मलिक यांच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहे. महाराष्ट्र सरकारने मलिक यांच्या बाबत आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे आणि हे सरकार आरोपीच्या पाठीशी आहे का? असा सवाल भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी केला.
भाजपाचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करून जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत राहील अशी भूमिका पालवे यांनी स्पष्ट केली आहे. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यानी,संजय राठोड, अनिल देशमुख, नवाब मलिक येतो झाकी है अनिल परब, धनंजय मुंडे, संजय राऊत अभी बाकी है… राजीनामा दया…राजीनामा दया …नवाब मलिक राजीनामा दया…गुन्हेगारांना पाठवळ देणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो….अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.
या निदर्शनाप्रसंगी आ.सीमा हिरे, प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, अरुण शेंदुर्णीकर, अमित घुगे, बाळासाहेब पाटील, रामहरी संभेराव, सुनिल देसाई, देवदत्त जोशी, अविनाश पाटील, भास्कर घोडेकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, सुरेश पाटील, हिमगौरी आडके, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, शाम पिंपरकर, सतिष रत्नपारखी, उदय जोशी, शशांक हिरे, ॲड.शाम बडोदे, गणेश कांबळे, अमोल पाटील, अजिंक्य साने, माधवी पढार, रवी पाटील, शिवम शिंपी, हेमंत शुक्ल, चंद्रकांत खोडे, दिपक राऊत, अंजली अभंगराव, प्रतिक शुक्ल, ज्योती चव्हाणके, संदिप शिरोळे, पवन उगले, प्रशांत वाघ, एकनाथ नवले, विनोद येवले, डॅा. वैभव महाले, अमोल गांगुर्डे, राम बडोदे, संगीता जाधव, विशाल जेजुरकर, पंकज ठाकरे, सोनाली कुलकर्णी, गणेश ठाकूर, समाधान दातिर, राम बडगुजर, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, राकेश पाटील, प्रविण भाटे, चारुदत्त आहेर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.