अजय अतुलच्या संगीतावर थिरकरणार अवघा महाराष्ट्र !

भव्य संगीत सोहळा २७ फेब्रुवारी रोजी दु. १२ आणि संध्या ७.०० वा. 

0

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राला ‘अप्सरा आली’, ‘वाजले की बारा’, ‘झिंग झिंग झिंगाट’ आणि मुझमे अभी, जय जय श्री गणेशा यांसारखी हिंदी – मराठी सुमधूर संगीत व गायन देणारी सुप्रसिद्ध, दिग्गज संगीतकार जोडी म्हणजे अजय – अतुल… आता हीच गाणी पुन्हाएकदा ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे कारण कलर्स मराठी घेऊन येत आहे सुरेल संगीतमय कार्यक्रम ‘अजय अतुल LIVE IN CONCERT Double Blast’. लोकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी, हजारो लोकांनी भरलेले मैदान, टाळ्यांचा कडकडाट, आंतरराष्ट्रीय वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला गाण्यातले दोन धृवतारे अजय – अतुल त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी एक मांनोरंजनाची मेजवानी ठरणार हे नक्की !

अजय – अतुल यांच्या संगीत कारकिर्दीतील काही निवडक आणि लोकप्रिय अश्या गाण्यांचा सुरेल नजराणा म्हणजे अजय अतुल LIVE IN CONCERT Double Blast. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना निखळ संगीताचा आनंद मिळणार आहे. बर्‍याच कालावधीनंतर अशी सुरेल संगीत संध्याकाळ प्रेक्षकांना ऐकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा हा भव्य संगीत सोहळा 27 फेब्रुवारी रोजी दु. 12 आणि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.     भारतीय संगीताला अजय – अतुल या जोडीने एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि यांची संगीत मैफल घरबसल्या ऐकायला मिळणे म्हणजे पर्वणीच नाही का ! या कार्यक्रमात प्रेक्षकांना अजय अतुल यांच्या संगीत कारकीर्दीतील अनेक गाजलेली गाणी ऐकण्याचा आनंद मिळणार आहे…

नटरंग चित्रपटातील नटरंग उभा,अगं बाई अरेच्चा सिनेमातील मल्हारवारी, दुर्गे दुर्गट भारी सावरखेड एक गाव चित्रपटातील आई भवानी अशी लोकप्रिय गाणी या कार्यक्रमातसादर होणार आहेत. तसेच अप्सरा आली, वाजले की बारा, सैराट चित्रपटातील झिंगाट अशी अतिशय लोकप्रिय गाणी प्रेक्षकांना पुन्हाएकदा ताल धरायला भाग पाडणार आहे तर नक्की ! अग्निपथमधील देवा श्री गणेशा, जोगवा चित्रपटामधील जीव रंगला या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढणार आहे…

अजय अतुल यांच्या गाण्यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीला देखील एकापेक्षा एक सुमधुर गाणी देऊन भुरळ घातली आहे. या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रालाच काय तर जगालाही ‘याड लावलं’ आहे. यांच्याच गाण्याची आंतरराष्ट्रीय वाद्यवृंदाच्या साथीने सजलेली मैफिल म्हणजेच “अजय अतुल LIVE IN CONCERT Double Blast” २७ फेब्रुवारी रोजी दु. १२ आणि संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!