नाशिक – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुळवंच (दगडवाडी) सिन्नर येथील तनिष्का सॅनेटरी प्रोडक्ट कंपनीच्या वतीने महिलांना १०५० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.आजही ग्रामीण भागात सॅनेटरी पॅड या प्रक्रियेबद्दल खूप वेगवेगळे गैरसमज अजुनही दिसून येतात. आणि त्यामुळे अनेक मुलींना व महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, कारण मासिक पाळीला नैसर्गिक प्रक्रिया म्हणून बघण्याची दृष्टी आपल्या ग्रामीण भागात आलेली नाही. यासंदर्भात अजूनही आपला ग्रामीण भागात जागृती नाही.
यावेळी रविंद्र कांगणेसर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन ग्रामीण भागातील महिलांना सॅनेटरी पॅड बद्दल महत्त्व पटवून दिले.तनिष्का सॅनेटरी प्रोडक्ट कंपनीच्या संचालिका नम्रता संतोष नवले व दगडवाडी या गावातील सर्व महिला व अंगणवाडी च्या महिला कार्येकर्णी उपस्थित होत्या.
महिलांनी आज खरचं या विषयावर जागृत राहून विचार करण्याची निवांत आवश्यकता आहे तसेच ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्यासाठी सॅनेटरी नॅपकिनचा वापर करावा, तसेच पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत असून औदयोगिक क्षेत्रातही त्या मागे नसल्याचे कंपनीच्या संचालिका नम्रता नवले यांनी सांगितले,या कार्यक्रमा प्रसंगी कवी रविंद्र कांगणे सर ,सरपंच भाऊदास शिरसाठ,ग्रामपंचायत सदस्य हौशीराम जेडगुले, कांता गुरकुले ,शालेय व्यवस्था अध्यक्ष जगन गुरकुले,मुख्याध्यापक शेख सर,शिक्षक मस्के सर अंगणवाडीच्या आशा कांदळकर, शोभा गुरकुले तनिष्का सॅनेटरी प्रोडक्टचे मार्गदर्शक संतोष नवले आदी उपस्थित होते