नाशिक – जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने फोटोग्राफी क्षेत्रातील महिलांचा सत्कार व सन्मान करणात आला. महाराष्ट्रातील एकमेव छायाचित्रकांरानसाठी नाशिक छायाचित्रकार संघटना हि नेहमीच सामाजिक बांधिलकी व व्यावसायिक दृष्टीने कार्यक्रम आयोजित करत असते असाच एक कार्यक्रम म्हणजे जागतिक महिला दिना निमित्त आयोजित छायाचित्रकार महिलांनचा सत्कार व सन्मान करण्यात आला हॉटेल पंचवटी यात्री येथे संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमात फोटोग्राफी, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग , डिझायनिंग करणाऱ्या एकूण ४८ महिलांनचा सन्मान (सन्मान पत्र) देऊन संघटनेच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला . विशेष म्हणजे गोदाघाटावर फोटोकाढून तत्काळ टुरिस्ट पर्यंत पोहचविणारया टुरिस्ट फोटोग्राफर महिला छायाचित्रकार सौ . सुमित्रा जाधव यांना फेटा व फोटोग्राफी क्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल संघटनेच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
या प्रसंगी सौ सुमित्रा जाधव यांनी संघटनेचे कार्य हे कौतुकास्पद आहे.आपले कार्य याच पद्धतीने चालू राहावे. महिलांन साठी राबवले जाणारे उपक्रम व हा महिला दिन वाखाण्याजोगे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांनी आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक मधील सर्व छायाचित्रकार महिलांचा एक व्यवसाईक वाॅटस्अप ग्रुप विचार काम व कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले .
याप्रसंगी पुणे येथील प्रसिद्ध महिला छायाचित्रकार सौ प्रियदर्शनी सचिन भोर मॅडम व औरंगाबाद येथील महिला फोटोग्राफर सौ.अनघा श्रीकृष्ण खेकाळे यांनी आ़ॅनलाईन उपस्थित महिलांना व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या उपक्रमा बद्दल कौतुक केले. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष – हिरामण सोनवणे. अध्यक्ष संजय जगताप.सह सेक्रेटरी. नंदु विसपुते. सल्लागार प्रताप पाटील , प्रशांत तांबट, किरण मुर्तडक, विलास आहिरे, कैलास निरगुडे अदि पदाधिकारी कमिटी मेंबर.सल्लागार .संघटक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीते साठी फोटोलाईटचे. संतोष लाले. राजु नाकिल, समिर बोंन्दार्डे छायाचित्रकार सौरभ अमृतकर, संदिप भालेराव, रविंद्र गवारे, मुन्ना ठाकूर आदि ने परिश्रम घेतले.