मुंबई – माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील अनेक रंजक वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि हि मालिका नुकतीच एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं कि यश आणि नेहा एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात.
होळीचा सण जवळ आला आहे आणि या मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे कारण या होळीमध्ये फुलणार आहे यश आणि नेहामधील प्रेम. नेहा, यश आणि परी एकमेकांसोबत पहिल्यांदा होळीचा सण एकत्र साजरा करणार आहेत. त्यामध्ये यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं काबुल करतो, त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचाही रंग चढताना प्रेक्षक पाहू शकतील. या मालिकेतील काही खास क्षणचित्रं या मालिकेच्या चाहत्यांसाठी.