सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांची ‘या’ मालिकेत होणार धमाकेदार एन्ट्री 

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा

0

मुंबई- स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रतापरावांकडून झालेल्या अपमानानंतर अंकुशने अबोलीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राहायला कुठेच आसरा नसल्यामुळे अबोलीने मंदिरात राहण्याचं ठरवलं आहे. अश्यातच मालिकेत डीसीपी किरण कुलकर्णी यांची एन्ट्री होणार आहे.

अबोलीला पुन्हा अंकुशच्या घरात प्रवेश मिळावा यासाठी किरण कुलकर्णी प्रयत्न करतील का हे पहाणं उत्सुकतेचं असेल सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर किरण कुलकर्णी हे पात्र साकारणार आहेत. या पात्रविषयी सांगताना उदय टिकेकर म्हणाले,’स्टार प्रवाहसोबत माझं खूप जुनं नातं आहे अगदी अग्निहोत्र पासून. अबोली मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा योग जुळून आला आहे.

किरण कुलकर्णी हे पात्र अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ आहे. त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं काय घडणार याचा उलगडा होईलच पण हे पात्र प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका अबोली रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!