भंगाराच्या गोदामाला भीषण आग : ११ जणांचा मृत्यू 

0

हैदराबाद – तेलंगणामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. हैदराबादमध्ये  एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत १ जण बचावला आहे.हैदराबादमधील भोईगुडा परिसरात ही घटना घडली आहे.आगीत मृत्युमुखी पडलेले मजूर बिहारचे होते भोईगुडा परिसरात शॉटसर्किटमुळे एका लाकडाच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. एकाच वेळी आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अग्निशमन आणि रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल आहे.तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी आगीत बिहारमधील कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शटर बंद असल्याने अडकून पडले कामगार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रद्दी गोदामाच्या पहिल्या मजल्यावर १२ मजूर झोपले होते. अचानक तळमजल्यावर आग लागली. तळमजल्यावरील रद्दीच्या दुकानातून कामगारांना बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता ज्याचे शटर बंद होते. आज सकाळी ८ वाजेपर्यंत ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.तर एक मजूर बाहेर पडण्यात यशस्वी झाला असून त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे ३ च्या सुमारास अलर्ट मिळाला आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांनी तीन तासांहून अधिक वेळ प्रयत्न केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!