नाशिककरांना मोठा दिलासा :मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस बाबत झाला ‘हा’निर्णय 

0

नाशिक – नोकरी साठी मुंबईला जाणाऱ्या नाशिक मनमाडच्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.या चाकरमान्यांची जुनी मागणी पूर्ण झाली असून आता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क २० पैकी १० डबे जनरल  करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर सर्वसाधारण मासिक पासधारकांसाठी दोन डबे जोडण्यात आलेत. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

मनमाड येथून सकाळी ६ वाजता सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस ही मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी यासह इतर गावांच्या प्रवाशांची लाइफलाइन मानली जाते. या गाडीतून रोज शेकडो सर्वसामान्य प्रवाशासोबत चाकरमानी प्रवास करतात. मात्र, कोरोना महामारी मुळे इतर रेल्वेप्रमाणे ही गाडी बंद करण्यात आली होती. चार महिन्यांपूर्वी  पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली. मात्र, चाकरमान्यांना मासिक पास दिले जात नव्हते. शिवाय सर्वसामान्य प्रवाशांना रिझर्व्हेशन करून प्रवास करावा लागत होता.

आता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क १० डबे जनरल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर सर्वसाधारण मासिक पासधारकांसाठी दोन डबे जोडण्यात आलेत. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालाय.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.