आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी नव्या गाईडलाईन्स जारी

0

नवी दिल्ली – जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भारतातून होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा २३ मार्च २०२०पासून बंद करण्यात आल्या होत्या.देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत असल्याने रविवारपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.

नव्या नियमानुसार, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यापूर्वी जे तीन सीट्सचे अंतर होते ते आता रद्द करण्यात आलं आहे. तसेच क्रू मेंमर्ससाठी व्यक्तीगत सुरक्षेसाठी पीपीई किटची आवश्यकता नसणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी आज नवे नियम जारी करण्यात आले असून त्यानुसार याआधी सुरक्षा व्यवस्थेकडून करण्यात येणारी पॅटडाऊन तपासणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.नियमात थोडी शिथिलता जरी दिली असली तरी विमानतळावर आणि विमानातून प्रवास करताना मास्कची आवश्यकता असणार आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!