नाशिक –संपूर्ण देशाला चलनी नोटा पुरवणाऱ्या करन्सी नोट प्रेसच्या आवारात आज दुपारी १२.१० वाजता भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार करन्सी नोट प्रेसच्या आवारात रंगाचे डबे, लाकडी वस्तू आदी स्क्रॅप मटेरियलच्या साठ्याला आग लागली.आग लागली त्या परिसरात मोठ्याप्रमाणात गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य होते.वाऱ्यामुळे आग पसरत आहे.आगीच्या ज्वाळा तसेच आसमंतात पसरणारा धूर पाहून जेलरोडवर नागरिकांची गर्दी उसळली आहे.आगीचे स्वरूप पाहून अग्निशामक दलाच्या सर्व केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले.उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.