Nashik : शहरातील पेट्रोलपंप २ एप्रिलला बंद 

पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर ही पेट्रोल पंपचालक'बंद'च्या भूमिकेवर ठाम 

0

नाशिक – विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हा पंप चालकांवर दाखल करण्यात येईल .तसेच विनाहेल्मेट दोनदा पेट्रोल दिल्याचे आढळल्यास त्या पंपाची एनओसी रद्द करण्यात येईल.असा पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांवर दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी पासून कारवाई करण्यात येईल. पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाच्या निषधार्थ नाशिक पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन  तर्फे नाशिक आयुक्तालय हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी कंपन्यांचे पेट्रोल पंप २ एप्रिल रोजी बंद ठेवणार येणार असल्याची माहिती नाशिक पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण लक्ष्मणराव भोसले यांनी एका पत्रकाद्वारा दिली आहे.

शुक्रवार दिनांक ०१ एप्रिल २०२२ रात्री बारा पासून ते शनिवार २ एप्रिल २०२२ रात्री बारा वाजे पर्यंत नाशिक आयुक्तालय हद्दीतील सर्व पेट्रोल पंपांवर डिझेल ,पेट्रोल ,सीएनजी व इतर सर्व पेट्रोलियम पदार्थ यांची विक्री २४ तासांसाठी बंद राहील .या काळात कुणालाही डिझेल किंवा इंधन पुरवठा केला जाणार नाही.असे ही पत्रकात नमूद केले आहे. गेले बरेच दिवस बायोडिझेल,डिझेल पेट्रोलची दरवाढ,सप्लायचा थोड्या फार प्रमाणात त्रास या आणि अशा अनेक विविध समस्यांचा पेट्रोलपंप चालक सामना करीत आहेत.

नाशिक शहरामध्ये पोलीस आयुक्तांनी नो हेल्मेट नो पेट्रोल या मोहिमेचा १५ ऑगस्ट २०२१  रोजी शुभारंभ केला होता .नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनने यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला .त्याबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी वेळोवेळी पेट्रोल डीलर चे कौतुक देखील केले .त्या काळामध्ये विना हेल्मेट ग्राहकांकडून मानहानी ,शिवीगाळ पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना तसेच पंप चालकांना मारहाण असेदेखील प्रकार घडले . हा सर्व ताण-तणाव मनस्ताप सहन करत पेट्रोल पंप चालकांनी या मोहिमेत आपला सहभाग चालू ठेवला . पोलीस बंदोबस्त काढून घेतल्यानंतरही हा सहभाग चालू होता .मात्र याच काळात पोलिस आयुक्तालय यांचेकडून आलेल्या सुधारित अतिरिक्त आदेश क्रमांक ४ ता. ३०.११.२१ यांचे नुसार नो हेल्मेट नो पेट्रोल चालू असताना देखील २१ जणांचा आयुक्तालय हद्दीत हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाला . याचा अर्थ उघड आहे पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा रस्त्यावर हेल्मेट सक्ती केली तर तिचा परिणाम अधिक प्रमाणात जाणवेल .मात्र या काळात काही पेट्रोल पंपांना एनओसी रद्द का करण्यात येऊ नये याच्या नोटिसा आल्याने संघटनेला नाईलाजाने उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.

माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आयुक्त यांच्याकडे सुनावणीसाठी दि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी अर्ज दाखल केला होता .मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही त्या अर्जावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. माननीय उच्च न्यायालयाने या अर्जावर सात दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. हे  सर्व काही चालू असतानाच अचानक काल पोलीस आयुक्त साहेब यांचे विधान प्रसारमाध्यमांवर ऐकले की विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हा पंप चालकांवर दाखल करण्यात येईल .तसेच विनाहेल्मेट दोनदा पेट्रोल दिल्याचे आढळल्यास त्या पंपाची एनओसी रद्द करण्यात येईल. हा निर्णय अतिशय एकतर्फी व आमच्यावर अन्याय करणारा आहे त्यामुळे .आज आम्ही माननीय पालक मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेतली व आमचे गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. त्यांनीदेखील माननीय आयुक्त यांच्याशी याबाबत बोलण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर आमच्या संघटनेची पुन्हा बैठक झाली. त्या बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत दिनांक १९ नोव्हेंबर 2021 रोजी आम्ही माननीय आयुक्त कडे उच्च न्यायालयातील वकीलांद्वारे केलेल्या अर्जाची सुनावणी होऊन तिचा लेखी निर्णय येत नाही तोपर्यंत नो हेल्मेट नो पेट्रोल या महिन्यात मोहिमेस कुठल्याही प्रकारचे सहकार्य करावयाचे नाही . त्यामुळे आमचा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजीचा नववर्ष दिन गुढीपाडवा या दिवशी नाईलाजाने विक्री बंद चा निर्णय कायम ठेवावा लागत आहे. सदर विक्री बंद ही नाइलाजाने अशी करावी लागत आहे की जर आम्ही विना हेल्मेट दुचाकी चालकाला पेट्रोल दिले नाही तर त्याच्याशी वाद विवादाचा ताण-तणाव,  मनस्ताप , शिवीगाळ आम्हाला सहन करावी लागेल.

अत्यावश्यक सेवेकरिता नाशिक शहरात असलेले ऑइल कंपन्यांचे स्वतःचे आउटलेट तसेच पोलिसांच्या अखत्यारीतील दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवांना इंधन पुरवतील. आम्ही सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की आपण देखील या काळाच्या आधीच आपल्याला आवश्यक असणारे इंधन भरून घ्यावे म्हणजे इंधन विक्री बंद काळात आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही . या एक दिवसाच्या विक्री बंद केल्यामुळे माननीय ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे हि पत्रकात म्हंटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.