मुंबई – झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रंजक वाटत आहेत. सौरभ, अनामिका या प्रमुख व्यक्तिरेखांप्रमाणेच पुष्पावल्ली, चंद्रलेखा, चंदू चिमणे या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
या मालिकेतील सौरभचा मित्र चंदू चिमणे याची भूमिका अभिनेता किरण भालेराव साकारत असून त्याची विनोदी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय. किरणचा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे. अभिनेता किरण भालेराव हा २००९ मध्ये गाजलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या पहिल्या पर्वाचा स्पर्धक होता. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी किरणने त्याची नोकरी देखील सोडली.
पण त्याच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे त्याने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. तू तेव्हा तशी मधील त्याने साकारलेला चंदू देखील प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटतो असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.