‘या’ तारखेपासून विद्यार्थ्यांना लागणार उन्हाळ्याच्या सुट्ट्या

0

पुणे – उन्हाळी सुटीबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने विध्यार्थ्यांच्या सुट्ट्यांबाबत निर्णय घेतल्याने विधार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील शाळांना येत्या २ मे ते १२ जून या कालावधीत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शाळा दिनांक १३ जूनपासून, तर विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली.

करोनामुळे ऑनलाइन शाळा जरी सुरु असल्या तरी प्रत्यक्ष शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर  या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता येण्यासाठी उन्हाळी सुटी आणि शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सोमवारी परिपत्रक प्रसिद्ध केले.

महाराष्ट्रातील पहिली ते नववी, अकरावीचा निकाल ३० एप्रिल रोजी किंवा त्यानंतरच्या सुटीच्या कालावधीत जाहीर करता येईल. मात्र तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळांतून उन्हाळ्याची आणि दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यांसारख्या सणांवेळी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने घ्यावी. शैक्षणिक वर्षातील सुट्या एकूण ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे ही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.