प्रगती करा, मात्र पर्यावरणाचा समतोल राखा : चिन्मय उदगीरकर

आयडिया कॉलेजच्या एक्सक्लेम प्रदर्शनाची सांगता

0

नाशिक (प्रतिनिधी) -आर्कीटेक्ट अर्थात तुम्ही ब्रम्ह देवासारखे काम करत असून त्यांचा क्रॅश कोर्स तुम्ही करत आहात. यातून नवनिर्मितीचे मोठ काम होत असून दिवसेंदिवस प्रगती करत नवनव्या गोष्टीचा शोध लावत आहात. जगणे अधिक सोपे आणि समृद्ध करण्याचा सतत प्रयत्न आहात. मात्र हे करत असताना जगण्याचा मुख्य आधार असलेल्या पर्यावरणाला विसरून मुळीच चालणार नाही. ही प्रगती साधताना पर्यावरणाचा समतोल राहणे ही आपलीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अभिनेता आणि पर्यावरण स्नेही चिन्मय उदगीरकर यांनी केले. ते विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात ‘आयडिया कॉलेज’च्या एक्सक्लेम प्रदर्शन सांगता समारंभात बोलत होते. यावेळी त्याच्या हस्ते वार्षिक बक्षीस वितरण संपन्न झाले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नाशिकमधून वाहणारी गोदावरी नदी हे आपले वैभव आहे. मात्र नदीवर मोठ्याप्रमाणात क्राँक्रिटीकरण झाले आहे. तर नदी पात्रालगत असलेल्या १०८ कुंडे बुजली असून त्याचे पुनर्जीवन झाले तर पाणी प्रश्न सुटण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे यासाठी प्रयत्न करायला हवे. सध्या ७२ टक्के भूजलपातळी कमी झालेली आहे. ती वाढण्यासाठी बांधकाम करतांना पावसाचे पाणी कसे जिरवता येईल यासाठी नवीन संकल्प, योजना आखायला हव्यात असेही त्यांनी सांगितले. नमी गोदा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेल्या केईआय वायर अॅण्ड केबलचे मॅनेजर अभिजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कुसुमाग्रज स्मारकामध्ये संपन्न झालेले हे प्रदर्शन ओरिटेक्चर अर्थात ओरिगामी आणि आर्कीटेक्चर यांचा संगम यावर आधारीत होते. यामध्ये ओरिटेक्चरचे वेगवेगळे मॉडेल्स मांडण्यात आले होते. याशिवाय कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी गावातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक घरांची उभारणी प्रदर्शनात मांडण्यात आली. सोबतच हुमायुची कबर, गोल घुमर यासारख्या ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृतीनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. सोबतच फोटोग्राफी आणि कला प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

यावेळी प्रदर्शनात श्रेयस गर्गे यांचे शिल्प निर्मितीचे प्रात्यक्षिक आणि महेंद्र जगताप यांची कॅलीग्राफीवर कार्यशाळा संपन्न झाली. तर शहरातल्या सर्व क्षेत्रातल्या नामवंत लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाला कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.