पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

0

मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले,उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लतादीदी या स्वरसम्राज्ञी आहेतच, पण त्याबरोबरच ती माझी मोठी बहीण होती. प्रेम आणि भावनेचा ओलावा देणाऱ्या लतादीदीकडून मला मोठ्या बहिणीसारखे प्रेम मिळाले आहे. यापेक्षा जीवनातील मोठे सौभाग्य काय असू शकेल? आता रक्षा बंधनाचा सण येईल तेव्हा दीदी नसेल. पुरस्कार, सन्मान स्वीकारणे यांपासून मी जरा दूरच असतो. मात्र लतादीदीसारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि मंगेशकर कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. म्हणून येथे येणे माझे कर्तव्य आहे, असे सांगतानाच हा पुरस्कार आपण देशवासियांना सपर्मित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

संगीताचे महत्त्व आपल्याला माहिती आहे. संगीताचा एक स्वरही डोळ्यातून अश्रू काढू शकतो. संगीताचे सूर वैराग्याची अनुभूती करून देऊ शकतो. संगीतात एवढी शक्ती आहे. संगीताचे हे सामर्थ्य ही शक्ती आपण लतादिदींच्या रुपाने अनुभवली आहे. या संगीत क्षेत्रातील यज्ञात मंगेशकर कुटुंबिय आहुती देत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सुमारे चार दशकांपासून मंगेशकर कुटुंबाशी आपले स्नेहाचे संबंध आहेत. लता दिदी आपल्या मोठ्या बहीणच होत्या. मोठ्या बहिणीचे प्रेम आपल्याला त्यांच्याकडून मिळाले आहे. हे आपले सौभाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच चित्रपट सृष्टीतील मान्यवरांसह सर्व क्षेत्रातील दिगग्ज उपस्थित हो

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.