सावाना निवडणूक : प्रा.दिलीप फडके आणि जातेगावकर यांच्या ‘ग्रंथालय भूषण’ पॅनलची घोषणा

१८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात

0

नाशिक – नाशिकच्या सार्वजानिक वाचनालयाची पंचवार्षिक (२०२२-२०२७) निवडणूक येत्या ८ मे रोजी होणार असून आज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण ३३ उमेदवारांनी माघार घेतली.सावानाच्या निवडूणुकीत आता २ पॅनल होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. १२ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. सावानाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १ अध्यक्ष २ उपाध्यक्ष आणि १५ कार्यकारिणी सदस्य असे उमेदवार असणार आहेत.आज प्रा.दिलीप फडके व जयप्रकाश जातेगांवकर यांच्या ‘ग्रंथालय भूषण’ पॅनलची घोषणा करण्यात आली.

आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवारी अर्जा पैकी विलास पोतदार व मकरंद सुखात्मे यांनी माघार घेतल्या मुळे आता प्रा.दिलीप फडके आणि वसंत खैरनार यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी ५ अर्ज आले होते त्यापैकी १ उमेदवारांनी माघार घेतली.तर १८ कार्यकारिणी सदस्यांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. या वर्षी ‘जनस्थान पॅनल’ने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे  १२ अपक्षांसह प्रा.दिलीप फडके व जयप्रकाश जातेगांवकर यांच्या ‘ग्रंथालय भूषण’ व श्रीकांत बेणी व वसंत खैरनार यांच्या ‘ग्रंथमित्र’ या पॅनल मध्ये लढत होणार आहे.

आज घोषित झालेले ‘ग्रंथालय भूषण’ पॅनलचे उमेदवार खालील प्रमाणे
अध्यक्ष – फडके दिलीप बा.
उपाध्यक्ष – प्रा. डॉ. कुटे सुनील यादव
उपाध्यक्ष – डॉ.जाधव विक्रांत चंद्रकांत

कार्यकारी मंडळ सदस्य
करंजकर संजय पांडुरंग
गायधनी सुरेश दत्तात्रय
जातेगांवकर जयप्रकाश रामकिसन
जाधव राजेन्द्र सुपडू
जोशी देवदत्त प्रभाकर
डॉ बोडके धर्माजी जयराम
ॲड बगदे अभिजीत मुकुंद
नातू गिरीश कृष्णराव
बर्वे जयेश शंकरराव
बेळे प्रेरणा धनंजय
मालपाठक मंगेश एकनाथ
मुंगी उदयकुमार दत्तात्रय
प्रा मुठाळ सोमनाथ काशिनाथ
लोंढे शाम धोंडीराम
डॉ शेजवळ राजेन्द्र त्रंबकराव

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.