मुंबई – महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा विचार असून आज मुख्यमंत्र्याच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.कोरोना आढावा संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उपस्थित होते.अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची आज संध्याकाळी राज्यातली सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे.
ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.आम्ही रोज २५ हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. हे टेस्टिंग वाढवत आहोत. सध्या आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे.आज राज्यात ९२९ ॲक्टिव्ह केसेस आहेत. पर मिलियनमध्ये आपण खूप कमी आहोत. दर लाखामागे राज्यात ७ केसेस आहेत. टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच ट्रॅकिंग सुद्धा आम्ही करणार आहोत. पॉझिटिव्ह केसेसचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येईल.असे ही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
लसीकरण करण्यात आपण खूप पुढे आहोत. ६ ते १२ वयोगटासाठी नव्याने लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमावली आली की लगेचच लसीकरण सुरु होईल. १२ ते १५ आणि १५ ते १७ वयोगटातील लसीकरण आम्ही वाढवत आहोत. सध्या नव्या कोणत्याही व्हायरसची माहिती नाही. प्रिकॉशन डोसमधे सुद्धा आम्ही गती वाढवत आहोत. हेल्थ वर्कर्सची संख्या लवकर वाढण्यात येईल. खाजगी ठिकाणी देखील उपलब्ध करण्यात येईल