सावाना निवडणूक : ग्रंथमित्र पॅनलच्या प्रचाराचा ग्रंथ भेट देऊन शुभारंभ
व्हिडीओ पहा
नाशिक –नाशिक जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा आत्मा समजले जाणाऱ्या १८२ वर्ष जुन्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक येत्या रविवार (८ मे) रोजी होत आहे. या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ सार्वजनिक वाचनालयात सरस्वती पूजन व ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. यावेळी ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवारांसह वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.
नाशिकचा १८२ वर्ष जुन्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक रविवार ८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनल या सर्वसमावेशक पॅनल ची निर्मिती झालेली असून या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ सार्वजनिक वाचनालयातील सरस्वती पूजन व ग्रंथ भेट देऊन करण्यात आला या पॅनलच्या सभासदांनी २५० ग्रंथ सार्वजनिक वाचनालय आला भेट देऊन प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी ग्रंथमित्र पॅनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार वसंतराव खैरनार यांनी सांगितले की ग्रंथमित्र पॅनल हा सर्वसमावेशक उमेदवारांचा पॅनल असून ‘ध्यास वाचनाचा, ध्यास वाचकांचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत.विविध क्षेत्रातील उमेदवारांच्या ज्ञानाचा फायदा या वाचनालयाला होऊन वाचनालयाला यशोशिखरावर पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.पॅनल चे प्रमुख श्रीकांत बेणी यांनी सांगितले की वाचनालय हे सर्व घटकांसाठी असावे आमची भूमिका देण्याची आहे २००८ साला पासून आम्ही ग्रंथमित्र पॅनल च्या माध्यमातून वाचनालयाच्या प्रगतीत भर टाकलेली आहे. सभासद सुज्ञ असून ते आम्हाला निवडून देतील याचा आत्मविश्वास आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार मधुकर भावे यांनी भेट दिलेली शेतकरी दिंडी, माझे गाव माझे जगणे, सभापती महोदय, भारतीय भाषांमधील स्त्रीवादी साहित्य, प्रेरक कार्याचा वसा, साहेब संध्याकाळी भेटले यासारखी अनेक साहित्यिकांची दुर्मिळ पुस्तके वाचनालयाला उमेदवारांनी भेट दिली. यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार वसंतराव खैरनार, मानसी देशमुख, श्रीकांत बेणी ,डॉ शंकर बोऱ्हाडे, रमेश कुशारे, प्रशांत जुन्नरे ,अनिल देशपांडे, हेमंत देवरे, मंगेश नागरे, अरुण नेवास्कर, अशोक यादव पाटील, संगीता बाफना,शिरीष राजे, भानुदास शौचे, अविनाश वाळुंजे ,तुषार सूर्यवंशी उपस्थित होते.