प्रथम चरणातील सुरु झालेल्या साडेसातीत मीन राशीच्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी : शनिशास्त्र
हरिअनंत,नाशिक
(हरिअनंत,नाशिक) मीन राशी काल पासून म्हणजेच २९ एप्रिलला साडेसातीचा प्रारंभ झालाय .मीन राशीवाल्यानी न चुकता शनिवारी शनीचे दर्शन घ्यावे.साडेसाती ऐकून भयभीत व्हायचे नाही.शनिदेव नियमांचे कठोर आहेत पण त्याहून अधिक ते अतिशय मायाळू आणि प्रेमळ आहेत.मीन, तुळ आणि वृषभ राशीत शनि सुवर्णपावलाने प्रवेश केलाय.मीन, तूळ वृषभ राशीस शनी उत्तमोत्तम आनंद प्राप्त करून देणार , यश देणार, अडलेली,रखडलेली कामे पूर्ण होणार अर्थात हे सर्व जन्मपत्रिकेतील इतर ग्रहांची स्थिती आणि यापूर्वी आणि आत्ता सुरू असलेल्या कर्मावर आनंद,यश अवलंबून आहे.
कारण या पृथ्वीतलावर कोणीही शनिपासून काहीही लपवू शकत नाही कारण शनी हा आत्म्याचा कारक आहे आणि आत्म्याशिवाय कोणी जीव जगूच शकत नाही म्हणून शनीला यमाग्रज म्हटलं जातं ‘यमाग्रज”यासाठी वेळ चांगली आहे म्हणून साडेसातीत खूप मोठे साहस करायचे नाही. जे काही करायचे ते पूर्ण विचार करून. सुवर्णपावलाने शनीचा प्रवेश म्हणजेच आनंदोत्सव.२९ एप्रिल रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत चांदीच्या पावलाने प्रवेश केला आणि हा योग ३० वर्षानंतर आला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मकर राशीवर शनीचा प्रभाव होता अर्थात मकर आणि कुंभ ही शनीची स्वराशी असल्यामुळे इतर राशीपेक्षा शनीचे कुंभ आणि मकर राशीवर विशेष लक्ष असते.
या कारणे मकर आणि कुंभ राशींच्या व्यक्तींनीच नव्हे तर ज्यांची नावे एस वरून आहेत त्यांनीही अतिशय सावधानतेने प्रत्येक कर्म पार पाडावे.११ जुलैपर्यंत शनिदेव कुंभ राशीत राहणार आहेत. मात्र शनीच्या या राशीपरिवर्तनाचा प्रभाव सर्वलोक आणि राशीवर कमी-अधिक प्रमाणात स्पष्टपणे दिसणार. १२ जुलै नंतर पुन्हा शनी वक्री होऊन मकर राशीत गोचर करणार आहे. २२-१० पर्यन्त ही स्थिती कायम राहणार आहे.
कर्क,वृश्चिक आणि कुंभ या राशीत शनीने चांदीच्या पावलाने तर मिथुन,कन्या व मकर राशीत ताम्र पावलाने तर मेष,धनु व सिंह राशीत लोखंडाच्या पावलाने शनीचा प्रवेश याचा ह्या राशींवर होणारा परिणाम (क्रमश:) भाग -१६१
साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत
