SpiceJet च्या मुंबई-दुर्गापूर विमानाला लँडिंगदरम्यान अपघात : १३ प्रवासी गंभीर जखमी

0

नवी दिल्ली – स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबई ते दुर्गापूर विमान पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यातील काझी नझरुल इस्लाम या विमानतळावर रविवारी १ मे रोजी उतरत असताना मोठ्या वादळाचा सामना करावा लागला.या दरम्यान विमानातील किमान १३ प्रवासी जखमी झाले.मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेदरम्यान अनेक प्रवासी चांगलेच घाबरले असल्याचं सांगण्यात येत आहे. सीटवर ठेवलेलं सामान खाली पडल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. मात्र, वैमानिकांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी भरलेलं हे विमान व्यवस्थितपणे वादळातून बाहेर काढण्यात आलं.विमान दुर्गापूर इथे उतरल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं. “स्पाईसजेटला या दुर्दैवी घटनेबद्दल खेद वाटतो आणि जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत पुरवत आहोत,” असं ते म्हणाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पाईसजेटचं बोईंग B737 विमान SG-945 नावाचे विमान दुर्गापूरच्या काझी नजरुल इस्लाम विमानतळावर उतरत असताना ते बैसाखी वादळात अडकले. यामुळे विमानावरील नियंत्रण गोंधळल्याने केबिनमध्ये ठेवलेले सामान प्रवाशांच्या अंगावर पडू लागले आणि त्यामुळे सुमारे ४० प्रवासी जखमी झाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!