ओझर विमानतळ परिसरात भीषण आग 

0

नाशिक –ओझर येथील  वायुदलाच्या धावपट्टी लगत असलेल्या गवतास आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी एअरफोर्स, एचएएल, नासिक मनपाच्या अग्नीशामक दलाच्या बंबांचे उशिरा पर्यत शर्थीचे प्रयत्न सुरू होते दरम्यान या आगीचे निश्चित कारण अद्याप समजु शकले नाही.

या बाबत समजलेली माहीती नुसार ओझर येथे भारतीय वायुसेनेचे विमानतळ असुन या विमानतळावरील धावपट्टीच्या आजुबाजुला गवताची विस्तीर्ण गायरान जागा आहे सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात कारणाने येथील गवताने अचानक पेट घेतला थोड्याच वेळात या आगीने रौद्र रूप धारण केले  सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने  वाळलेल्या गवताने अल्पकाळातच ओझरसह मोहाडी, साकोरा भागापर्यंत हि आग पसरत गेली या आगीत अनेक वन्यप्राणी मुत्युमुखी पडल्याचे समजते आहे.

दरम्यान आग लागल्याचे समजताच वायुसेना व विमानतळ प्रशासनाने तात्काळ एचएएल, एअरफोर्स,  नासिक मनपा येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधला .अग्निशामक दलाचे जवान उशिरा पर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते .उन्हाळ्याचे दिवस व सुके गवत असल्याने आग लवकर आटोक्यात येत नव्हती अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यातयश आल्याचे समजते आहे. मात्र आगीचे निश्चित कारण अद्याप समजु शकले नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!