नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज कार्यकारिणी सदस्यांच्या मतमोजणी होणार असून कार्यकारिणी सदस्य पदाच्या निवडणूकीत आज कोण बाझी मारणार या कडे सर्वांचं लक्ष लागून आहे.सकाळी १० पासून मतपेट्या फोडण्यास सुरुवात झाली असून काहीवेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
तीस कार्यकारीणी पदासाठी ४२ उमेदवार रिंगणात असून वसंत खैरनार आणि श्रीकांत बेणी यांच्या ग्रंथ मित्र पॅनलचे १५ तर प्रा.दिलीप फडके आणि जयप्रकाश जातेगांवकर यांच्या ग्रंथालय भूषण पॅनलचे १५ या सह १२ अपक्ष उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले आहेत.
काल झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.अध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे प्रा.दिलीप फडके आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ.विक्रांत जाधव ,प्रा. सुनील कुटे यांना मतदारांनी पसंती दर्शवून निवडून दिले आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत अपक्षांसह कोण बाझी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारीणीसदस्य पदाच्या मतमोजणीच्या चार फेऱ्या होणार असून दुपार पर्यंत मतदारांचा कल कोणाकडे आहे हे समजणार आहे.