असानी चक्री वादळात समुद्रात अचानक एक सोन्याचा रथ दिसून आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्र किनाऱ्यावर हा सोनेरी रंगाचा रथ रहस्यमयीरित्या वाहून आल्याचे व्हिडिओ मध्ये दिसते आहे.हा रथ बघून किनारपट्टीवरील ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला .
या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्यावरील लोक हा रथ पाण्यातून ओढून किनाऱ्यावर आणताना दिसत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील नौपाडाच्या उपनिरीक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती गुप्तचर विभागाला देण्यात आली आहे. एस आय म्हणाले, हा रथ दुसऱ्या एखाद्या देशातूनही वाहून आलेला असू शकतो. यासंदर्भात आम्ही गुप्तचर विभागाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.”
#WATCH | Andhra Pradesh: A mysterious gold-coloured chariot washed ashore at Sunnapalli Sea Harbour in Srikakulam y'day, as the sea remained turbulent due to #CycloneAsani
SI Naupada says, "It might've come from another country. We've informed Intelligence & higher officials." pic.twitter.com/XunW5cNy6O
— ANI (@ANI) May 11, 2022
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, असानी चक्रीवादळात बुधवारी आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीकडे सरकले. राज्यातील नरसापूरमध्ये ३४ किमी आतपर्यंत याचा प्रभाव दिसून आला. यावेळी जवळपास ८५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. याचवेळी या परिसरात मुसळधार पाऊसही झाला.
दिलासादायक गोष्ट म्हणजे, हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर जाण्याची आणि गुरुवारपर्यंत कमकुवत होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तत्पूर्वी, हवामान विभागाने मच्छिमारांना गुरुवारपर्यंत खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रेल्वेने चक्रिवादळामुळे आपल्या अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे.