लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर दाखल झाले उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, मोदींच्या स्वागतापेक्षा योगींनी केलेल्या ट्विटची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर विविध चर्चेला उधाण आले आहे.
काय आहे योगींचे ट्विट
मुख्यमंत्री योगींनी ट्विटमध्ये म्हणले आहे. शेषावतार भगवान श्री लक्ष्मण यांच्या लखनऊ या पवित्र नगरीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आणि अभिवादन. याोगी यांच्या ट्विटमुळे लखनऊ शहराचे नाव बदलले जाणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘अयोध्या’ आणि अलाहाबादचे ‘प्रयागराज’ करण्याच्या दोन प्रलंबित मागण्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. आता त्यांचे पुढचे ध्येय लखनऊचे नामांतर असल्याची जोरदार चर्चा या ट्विट मुळे सुरु आहे आहे. असे म्हणतात, की पूर्वी लखनऊचे नाव लक्ष्मणपुरी होते आणि नंतर ते बदलले गेले. लखनऊचे नाव बदलून ‘लक्ष्मणपुरी’ करण्याची मागणी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी वेळोवेळी केली आहे.
लखनऊच्या महापौर संयुक्त भाटिया यांनी गोमती नदीजवळ लखनऊ महानगरपालिकेद्वारे लक्ष्मणचा १५१ फूट उंच पुतळा बसवण्याची योजना आखली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या कार्यकाळात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्रा यांनी लखनऊचे नाव बदलून लक्ष्मणपुरी करण्याची मागणी केली होती. हे सर्वानुमते मते झाले तर लोकांना जुन्या काळातील संस्कृतीशी जोडण्यास मदत होईल, असे ते म्हणाले होते.
शेषावतार भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी लखनऊ में आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन… pic.twitter.com/zpEmxzS3OE
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 16, 2022