नाशिकमध्ये पूर्णाक्षी पंडीतच्या कृतीशील उपक्रमाचा शुभारंभ

मुक्या जनावरांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा हक्क :पूर्णाक्षी पंडीत या तरुणीच्या उपक्रमाच्या पोष्टरचे प्रकाशन

0

नाशिक – एका श्वानाला  गटारीचे पाणी पिताना पाहिल्यावर पूर्णाक्षी पंडीत या तरुणीला माणसाप्रमाणे मुक्या जनावरांनाही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळायला हवा, या भावनेने रुंजन घातले. त्याचक्षणी तिने मुक्या जनावरांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. सध्या शहरामध्ये कलर्स मराठी वाहिनीच्या योग योगेश्वर जयशंकर या मालिकेच्या सुरु असलेल्या चित्रीकरणाच्या सेटवर पूर्णाक्षीच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

अभिनेते चिन्मय उदगीरकर, संदीप गायकवाड, निर्माते संजय झनकर यांच्या हस्ते उपक्रमाच्या पोष्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच मालिकेच्या सेटवर मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी भांडी ठेवण्यात आली आहेत. रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण, उद्योजक तुषार चव्हाण, राजेश पंडीत आदी उपस्थित होते. पूर्णाक्षीने तिला सूचलेली कल्पना आणि त्याला दिलेले मूर्त रुप याची माहिती देताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

आपल्या घरातील पाळीव प्राणी, श्वानांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण करतो. मात्र भटकंती करणाऱ्या श्वानांसह जनावरांसाठी ती व्यवस्था नसते. म्हणून प्रत्येकाने आपल्या समवेत भांडे आणि पाण्याची बाटली शिवाय शक्य असल्यास खाऊ ठेवायला हवा. भटकंती करणारे श्वान, जनावरे नजरेस पडले, की त्यांना पिण्यासाठी पाणी द्यावे. शिवाय घराबाहेर देखील भटकंती करणाऱ्या प्राण्यांची तहान भागवण्याची व्यवस्था करावी. ही चळवळ नाशिककरांनी पुढे न्यावी, असे पूर्णाक्षीने सांगितले.

मुक्या जनावरांसाठी पूर्णाक्षीने राबवलेला उपक्रम स्त्युत्य आहे, अशी कौतुकाची थाप अभिनेते चिन्मय आणि संदीप यांनी दिली. गोदावरी निर्मल आणि निरंतर वाहती रहावी यासाठी नाशिककर प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्राण्यांना न विसरता त्यांना पिण्याच्या पाण्याचा हक्क द्यायला हवा, असा विचार पूर्णाक्षीला सूचला आणि तिने कृतीशील उपक्रमाला सुरवात केल्याबद्दल तिचे अभिनंदन, असे चिन्मय यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात आम्हीही खारीचा वाटा उचलू असे अभिनेते संदीप यांनी स्पष्ट केले.

मुक्या जनावरांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या कृतीशील पूर्णाक्षी पंडीत या तरुणीच्या उपक्रमाच्या पोष्टरचे प्रकाशन अभिनेते चिन्मय उदगीरकर, संदीप गायकवाड, निर्माता संजय झनकर यांच्या हस्ते योग योगेश्वर जयशंकर या मालिकेच्या सेटवर झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण, उद्योजक तुषार चव्हाण, आर्चित मांडवकर, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!