नाशिक : आयटीआय सिग्नल जवळ रिक्षावर झाड कोसळले : २ जण ठार 

0

नाशिक – नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवर आयटीआय सिग्नलजवळ रिक्षावर झाड कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना आज घडली, मृतांत रिक्षाचालकासह एका प्रवाशी महिलेचा समावेश आहे,

एम एच १५एफ यू ०३६० या रिक्षावर झाड कोसळले, रिक्षाचा चक्काचूर झाला असून झाडाखाली दबल्या मुळे दोघेही जागीच गतप्राण झाले, अपघातानंतर बघ्याची मोठी गर्दी झाली होती, एबीबी सर्कल परिसरात हा अपघात झाल

शहरात मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात  धोकेदायक वृक्ष कोसळत असल्याचे प्रकार घडत आहे.अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शनिवारी सकाळी आयटीआय सिग्नलवर रिक्षावर  गुलमोहरचे झाड कोसळून दोन प्रवासी ठार झाले. त्यामुळे धोकादायक वृक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्रंबकरोड वरील असे अनेक असुरक्षित झाडे यांना त्वरित संरक्षण द्यावे.अथवा त्यांना तिथून काढून दुसरीकडे हलवावे अशी मागणी ऍडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांच्यासह  महात्मानगर रहिवाशांनी तर्फे करण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!