आज सायंकाळी राजभवनावर होणार शपथविधी सोहळा

महाराष्ट्रला नवे सरकार मिळणार: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

0

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होईल हे निश्चित झाले आहे. आज संध्याकाळीच ७ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय. राजभवनावर हा शपथविधी सोहळा साध्या पद्धतीने होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईत दाखल झाले असून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.

काहीवेळा पूर्वी एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस भाजपा नेत्यांसह राजभवनावर निघाले असून आज संध्याकाळी महाराष्ट्राला नवे सरकार मिळणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!