मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपाचे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते.चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले.सुरवातीला आवाजी मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु विरोधकांनी पोल अशी मागणी केल्या मुळे शिरगणती घेतली गेली. त्यात राहुल नार्वेकर यांना १६४ मत मिळाली तर शिवसेनचे राजन साळवी यांना १०७ मत पडली तर सपाचे ०३ आमदार तटस्थ होते. नार्वेकरांना १६४ मत पडल्याने विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपसभापदी नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.
शिवसेनेने काढलेला व्हीप शिंदे गटाने पाळला नाही त्यांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मत मिळाली. या राजकीय गदारोळात अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.