मुंबई – महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने फ्लोर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध केले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदे सेनेनेही सत्तेची फायनल जिंकली आहे. एकनाथ शिंदे सरकारला सध्या कोणताही धोका नसल्याचे बहुमत चाचणीने निश्चित केले आहे. त्यांच्या सरकारच्या समर्थनार्थ एकूण १६४ मते पडली, तर विरोधात ९९ मते पडली. या आधी रविवारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनीही तितकीच मते मिळवून सभापतीपदाची निवडणूक जिंकली.
कालच्या प्रमाणे आजही चार आमदार तटस्थ राहिले. कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला ८ मते कमी पडली. एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. विश्वास ठराव जिंकल्यानंतर आता शिंदे सरकार अडीच वर्षासाठी आपला कारभार करणार आहे.
हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय नाट्यानंतर ते थेट मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर प्रथमच ते त्यांच्या लुईसवाडी येथील ‘शुभ-दिप’ या निवास्थानी जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घरापासून दूर राहिलेले शिंदे आज घरी परतणार आहेत. तर ठाणे शहरातील समस्त शिवसैनिक आणि नागरिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.