इन्फिनिक्सचा ‘एक्स१ 40-इंच’ अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही लॉन्च 

0

मुंबई: इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपच्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने ३२ इंच आणि ४३ इंच प्रकारातील यशानंतर आता नवा अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही- इन्फिनिक्स एक्स१ ४०- इंच हा टीव्ही बाजारात लॉन्च केला आहे. आयकेअर टेक्नोलॉजी आधारित असलेल्या या टीव्हीद्वारे पाहण्याचा सुरक्षित अनुभव मिळणार आहे. कारण टीव्ही पाहताना यातील ब्लू लाइट वेव्हलेंथ काढू टाकल्या जातात. स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर ६ ऑगस्टपासून १९,९९९ रुपयांच्या प्राथमिक किंमतीपासून उपलब्ध आहे.

इन्फिनिक्सच्या अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही, बेझल लेस एफएचडी स्क्रीनसह, एचडीआर १०, एचएलजी आणि ३५० एनआयटीएस ब्राइटनेससह येत असून आयकेअर टेक्नोलॉजी वर आधारित हा टीव्ही धोकादायक नीळा प्रकाश काढून टाकतो आणि वर्धित रंग, ब्राइटनेस, शार्पनेस आणि रंगसंगतीची शाश्वती देणार आहे.इन्फिनिक्स एक्स१ सीरीजमध्ये इन-बिल्ट बॉक्स स्पीकर्स असून याद्वारे हायर बेस इफेक्टसह उत्कृष्ट साउंडचा अनुभव मिळणार असून २४ व्हॉट्स बॉक्स सीकर्स आणि डॉल्बी ऑडिओच्या मिलापातून समृद्ध, स्पष्ट, शक्तीशाली सिनेमॅटिक साराउंड साउंड अनुभवग्राहकांना मिळणार आहे.

अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही हा नव्या मीडियाटेक ६४ बिट क्वाड कोअर चिपसेटची सुविधा  असून यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी रोमची सुविधा आहे. याद्वारे कमी ऊर्जा वापरून दर्जेदार परफॉर्मन्स ग्राहकांना मिळणार आहे. इन्फिनिक्स एक्स१ ४०-इंच टीव्हीमध्ये बिल्ट इन क्रोमकास्टची सुविधा आहे. याद्वारे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, युट्यूब आणि अॅप स्टोअरमधून ५०००+ जास्त आवडते व्हिडिओ पाहण्यासाठी अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.टीव्हीचा वापर डान्सफ्लोअर, रेसट्रॅक आणि बऱ्याच स्वरुपात करता येते.

इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ श्री अनिश कपूर म्हणाले, “हार्डवेअर आणि सॉ‌फ्टवेअरचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या या टीव्हीद्वारे पाहण्याचा सुरक्षित अनुभव तर मिळेलच. पण यासह घर किंवा ऑफिसच्या इंटेरिअरची शोभाही वाढेल. यूझर्सना ५०००+ गूगल अॅप्सचे अॅक्सेस मिळेल तसेच त्यांचा स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनचे मिरर करून मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचा कोणताही कंटेंट पाहू शकतील. जे यूझर्स स्टाइल आणि वैशिष्ट्यांशी तडजोड करत नाहीत, तसेच खर्च केल्या जाणाऱ्या पैशांना मूल्य असावे, याचा विचार करतात, त्या सर्वांच्या गरजा इन्फिनिक्स एक्स१ स्मार्ट टीव्ही सीरीजद्वारे पुरवल्या जातील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.