आजचे राशिभविष्य सोमवार, ८ ऑगस्ट २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण शुक्ल एकादशी, दक्षिणायन, वर्षा ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज अनिष्ट दिवस, ‘वैधृती’ योग आहे. *पुत्रदा एकादशी* शिवामूठ (तीळ) घबाड रात्री ९.०१ नंतर
चंद्रनक्षत्र – जेष्ठ (दुपारी २.३७ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आज फार दगदग नको. उत्तरार्ध चांगला आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. संध्याकाळ विश्रांतीची.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा पूर्वार्ध  आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. आध्यत्मिक लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तंत्र अवगत होईल. कणखर भूमिका घ्या. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तरतूद होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जमिनीची कामे मार्गी लागतील. संयम आवश्यक आहे. स्पर्धेत यश मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. पूर्वार्ध लाभदायक आहे. प्रेमात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) वाद मिटतील. जुने बंध जुळून येतील. नवीन संधी चालून येतील. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  महत्वाच्या गाठी -भेटी होतील. गुंतवणूक कामी येईल. कलाकारांना यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा पूर्वार्ध आळसात जाईल. दिवसाची काळजीपुर्वक आखणी करा. आडाखे चुकू शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. कामाला वेग येईल. संध्याकाळी खर्चात वाढ संभवते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चंद्राचा शनिशी लाभ योग आहे. अत्यंत लाभदायक दिवस आहे. वेळ दवडू नका.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) प्रवास कार्यसाधक होतील. मनमिळाऊ स्वभावाचा प्रत्यय येईल. वरिष्ठ खुश राहतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!