डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट प्रणव सातभाईच्या निवडक पोर्ट्रटचे प्रदर्शन
१३ ते १५ ऑगस्ट रोजी कुसुमाग्रज स्मारकात आयोजन
नाशिक – डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट अशी ओळख असलेल्या नाशिकच्या प्रणव सातभाईने आजवर केलेल्या पोर्ट्रेटचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन १३-१४-१५ ऑगस्ट रोजी कुसुमाग्रज स्मारक येथे भरविण्यात येणार आहे.
प्रणवला फोटोग्राफीची आवड आहे. त्यात तो शिक्षण घेत असून त्याने गेल्या तीन वर्षात १००० हून अधिक पोर्ट्रेट बनवून वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले आहे. यामध्ये मराठी हिंदीतील कलाकारांची सर्वाधिक पोर्ट्रेट त्याने बनवली आहेत. तसेच या सगळ्याकडे तो व्यवसाय म्हणूनही बघतो आहे.
यातीलच काही निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर पुढचे तीन दिवस सर्वांसाठी खुले आहे.
आपल्याला जर आपले पोर्ट्रेट काढून घ्यायचे असेल तर स्पॉट रजिस्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रजिस्ट्रेशन वर सुट देण्यात येणार आहे.या प्रदर्शनाला नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.