प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

न्यूयॉर्क-प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ही माहिती दिली आहे.अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमादरम्यान ते व्याख्यान देत असतांना हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रश्दी जेव्हा व्याख्यान देणार होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक रश्दी हे १९८० च्या दशकात त्यांच्या पुस्तकाबद्दल वादात सापडले होते. या पुस्तकाबद्दल मुस्लिम समाजात प्रचंड रोष होता, एका धर्मगुरूने त्यांच्या मृत्यूचा फतवाही काढला होता.रश्दी हे मूळचे भारतीय वंशाचे असून ते ब्रिटीश नागरिक आहेत.

तर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, न्यूयॉर्क येथील शुटोक्वा संस्थेत एका विषयावर ते भाषण देणार होते. सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रश्दी यांची ओळख सांगण्यात येत होती. तेव्हा प्रेक्षकांमधून एक माणूस व्यासपीठाच्या दिशेने धावत आला. त्याने रश्दींवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे रश्दी जमिनीवर कोसळले. या हल्लेखोराला पकडण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!