नाशिक – वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, नाशिकचा डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट प्रणव सातभाईने आजवर केलेल्या निवडक पोर्ट्रेटचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन १३-१४-१५ ऑगस्ट रोजी कुसुमाग्रज कलादालन येथे भरविण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी प्रख्यात ज्योतिषतज्ञ अतुल शास्त्री भगरे गुरुजी, प्रसिद्ध अभिनेत्री नुपूर सावजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अशा प्रकारचे डिजिटल पोर्ट्रेटचे प्रदर्शन करणारा प्रणव हा पहिला तरुण असून नाशिकमध्ये पहिल्यांदाच हे प्रदर्शन होत असल्याने कलाप्रेमींसह नाशिककरांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. हे प्रदर्शन आज पासून पुढील दोन दिवस सर्वांसाठी खुले असणार आहे.
महत्वाचे म्हणजे आपल्याला जर आपले पोर्ट्रेट काढून घ्यायचे असेल तर या प्रदर्शना दरम्यान स्पॉट रजिस्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि रजिस्ट्रेशन वर सुटही देण्यात येणार आहे.या प्रदर्शनाला नाशिककरांसह कलाप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.