बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी

0

मुंबई,२४ ऑगस्ट – बॉलिवूड सुपरस्टार ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन या बाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात  माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्यावी , असं आवाहन बच्चन यांनी ट्विटर द्वारे केलंय.

यापूर्वी जुलै २०२० मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन  यांना कोरोनाची लागण झाली होती. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्वीट करत आपणास कोरोना झाल्याची माहिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी जया बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीची कोरोना चाचणी मात्र निगेटीव्ह आली होती.

‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १४’ हा कार्यक्रम ७ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कार्यक्रमच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ‘कौन बनेगा करोडपती १४’ चे शूटिंगला देखील ब्रेक लागला आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

काही दिवसा पासून राज्यासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढता आहेत आज मुंबईत ८३२ रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये ६२६९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर ९७० दिवसांवर गेला आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.