थाटात पार पडला प्रवाह पिक्चर पुरस्कार नामांकन सोहळा २०२२

मराठी कलाविश्वातील दिग्गजांची खास उपस्थिती 

0

मुंबई,२९ ऑगस्ट २०२२ -दर रविवारी नव्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर भेटीला आणणारी डिस्ने स्टार नेटवर्कची प्रवाह पिक्चर ही मराठी चित्रपटांची वाहिनी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. दर्जेदार मराठी सिनेमांची मेजवानी सादर केल्यानंतर प्रवाह पिक्चर वाहिनी सज्ज आहे पहिल्यावहिल्या प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यासाठी. मराठी सिनेमांची यशस्वी घोडदौड आपण सर्वच जण अनुभवत आहोत. हेच मराठी सिनेमे, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा पुरस्कार सोहळा असेल. विशेष म्हणजे हा पुरस्कार सोहळा संपूर्णपणे मराठी चित्रपटांसाठी वाहिलेला असेल. मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच प्रवाह पिक्चर पुरस्कार नामांकन सोहळा पार पडला. सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ चांदेकरच्या खुमासदार सुत्रसंचालनाने या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. विशेष म्हणजे नामांकन सोहळ्यात प्रवाह पिक्चरच्या सन्मानचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. मराठी परंपरेचं प्रतीक असणाऱ्या या सन्मानचिन्हाचं मराठी कलाविश्वातून कौतुक करण्यात आलं.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स तंत्र, सर्वोत्कृष्ट ध्वनी योजना, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट साहस दृश्य, सर्वोत्कृष्ट पात्र योजना, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट गीत लेखन, सर्वोत्कृष्ट गायक-गायिका, सर्वोत्कृष्ट नायक – नायिका, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (पुरुष-स्त्री) आणि सर्वोत्कृष्ट खलनायक – खलनायिका अश्या एकूण २८ विभागांमध्ये नामांकन जाहीर करण्यात आली.

या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार. प्रवाह पिक्चर वाहिनीवर लवकरच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!