मुंबई, २९ ऑगस्ट२०२२- रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.आज होणाऱ्या रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या सभेदरम्यान रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5 G सेवा सुरु होणार आहे. मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लाँच होणार आहे.पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.रिलायन्स जिओ 5G मुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात 5G सेवा सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली अशा महानगरांसह काही मोठ्या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरु केली जाणार आहे. डिसेंबर २०२३पर्यंत देशभरातील प्रत्येक शहर, तालुक्यापर्यंत जिओ 5G पोहोचणार आहे.मुकेश अंबानी यांनी सांगितले की, मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
स्वस्तातील 5G मोबाईल फोन देणार
रिलायन्स जिओ स्टॅण्डअलोन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. रिलायन्सने क्वॉलकॉम आणि इंटेलसोबत भागिदारी करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. स्वस्तातील 5G मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स गुगलसोबत भागिदारी करणार आहे.
जिओकडून एअरफायबरची घोषणा
जिओकडून एअरफायबरची घोषणा करण्यात आली आहे. जिओ एअरफायबरमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा स्पीड अधिक असणार. फिक्स्ड ब्रॉडबॅण्डमध्ये भारत येत्या काळात पहिल्या १० देशांमध्ये असणार असल्याचे सांगत आले.
Reliance Jio has prepared world’s fastest 5G rollout plan. By Diwali 2022 we'll launch Jio 5G across multiple key cities, incl metro cities of Delhi, Mumbai, Chennai & Kolkata. By Dec 2023, we will deliver Jio 5G to every town, taluka & tehsil of India: Mukesh Ambani, CMD, RIL pic.twitter.com/kOkvzFueq5
— ANI (@ANI) August 29, 2022