मुंबई,१ सप्टेंबर २०२२ – झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली नवी मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ प्रेक्षकांना भावत आहे, या मालिकेतील अप्पी सोबतच अर्जुन हे पात्र देखील भलतंच भाव खाऊन जातंय. या मालिकेत अर्जुनची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुराम ह्याने आपल्या पत्नी सोबत भोरच्या मूकबधिर शाळेला भेट दिली.
रोहित हा मूळचा भोरचा आहे. रोहितने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडिया वर शेअर केली त्यात रोहितने गणेश उत्सवाच्या निमित्ताने भोर एजुकेशन चे मूकबधिर विद्यालयाला भेट दिली. तिथे जाऊन मिठाई वाटून सगळ्यांचे तोंड गोड़ केले व त्यांच्यात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. या भेटीमध्ये रोहितला जाणवले कि मूकबधिर मुलांना बोलता येत नसले किंवा ऐकता येत नसले तरीही ते मनात जल्लोषाने गणरायाचा जय जयकार करत असतात व त्यांचा भक्तिभाव ते त्यांच्या कृतीतून व्यक्त करतात. या संवेदनशील क्षणांनी रोहित भारावून गेला.