शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे तातडीने अहवाल पाठवा
खा. गोडसे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
नाशिक,१२ सप्टेंबर २०२२- महिनाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा प्रकोप झालेला आहे.काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.या कोसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके आणि घरांची तसेच गाव रस्ते ,पशुधन आणि पाझर तलावांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आणि भरघोस नुकसान भरपाई देण्यासाठी लवकरात लवकर नुकसानींचे पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना आज खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून सतत कोसळण्याचा अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटांना तोंड देत आहेत.अशातच गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचा प्रकोप झाला असून अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.या कोसळतात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कधी नव्हे इतके नुकसान झाले आहेत. यामुळे शेतकरी आता कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार गोडसे यांनी आज जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांची भेट घेतली.
काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नेमके किती आणि कसे नुकसान झाले आहे.यामुळे भविष्यात शेतकरी कसा अडचणीमध्ये येणार आहे याविषयीच्या सविस्तर व्यथा आज खासदार गोडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. दरवर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे अशातच आता गेल्या महिनाभरापासून पावसाचा प्रकल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची घरांची कधी नवे इतके मोठे नुकसान झालेले आहे. गाव रस्ते सर्वत्र उखडलेले असून अनेक ठिकाणचे बंधारे फुटले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे भविष्यात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना तातडीने आणि भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर नुकसानींचे पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना आज खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.