वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या ईश्वरी सावकारची निवड
बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजी मुळे निवड
नाशिक, १० ऑक्टोबर २०२२ – नाशिक क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील अजून एक आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार ची देखील वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. रसिका शिंदे ,माया सोनवणे व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात यापूर्वीच निवड झाली आहे.
ईश्वरी ला बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजीची ताबडतोब पावती मिळाली . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , चंदिगड येथे झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत कर्णधार व सलामीची उकृष्ट फलंदाज म्हणून स्पर्धेत महाराष्ट्र तर्फे सर्वाधिक धावा केल्या तर भारतात तिसऱ्या स्थानी राहुन चांगली छाप पाडली. स्पर्धेतील पाच पैकी तीन सामने महाराष्ट्र संघाने जिंकले . सलामीवीर म्हणून पाचही सामन्यांत ईश्वरी सावकारने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करताना महाराष्ट्र संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी मोठा वाटा उचलला. ईश्वरीने स्पर्धेत केलेल्या संघांनीहाय धावा अशा : मिझोराम विरुद्ध ४० ,केरळ ४१ , वडोदरा ४६, मणिपूर ३९ व हरयाणा विरुद्ध २७.
ईश्वरीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने मिझोराम व केरळ विरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकून जोरदार सुरुवात केली . त्यानंतर तिसर्या समन्यात वडोदरा विरुद्ध महाराष्ट्राला केवळ २ धावांनी निसटता पराभव स्वीकारवा लागला . चौथ्या सामन्यात पुनरागमन करत मणिपूर वर महाराष्ट्र संघाने मोठा विजय मिळविला. या सामन्यात संधि मिळलेल्या नाशिकच्या जलदगती गोलंदाज शाल्मली क्षत्रियने प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दोन षटकात केवळ ७ धावा देत १ गडी बाद केला .पाचव्या व शेवटच्या साखळी सामन्यात मात्र हरयाणाने ५६ धावांनी विजय मिळवला.
ईश्वरी च्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , खास अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी स्पर्धा .
संक्षिप्त धावफलक व निकाल :
महाराष्ट्र वि हरियाणा – हरियाणाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली .
हरयाणा – २० षटकांत ६ बाद १२८ – सोनिया मेंधिया ४०, त्रिवेणी वसिष्ठ नाबाद ४०. वि।
महाराष्ट्र – १६.५ षटकांत सर्वबाद ७२ – श्वेता सावंत २८, , ईश्वरी सावकार २७. हरयाणा ५६ धावांनी विजयी.
महाराष्ट्र वि मणिपूर – महाराष्ट्र ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली .
महाराष्ट्र – २० षटकांत २ बाद १७६ – के एन मुल्ला ९८, ईश्वरी सावकार ३९ वि.
मणिपूर -१४.५ षटकांत सर्वबाद ४२ – श्वेता सावंत ४, समृद्धि बनवणे व इशिता खळे प्रत्येकी २ तर शाल्मली क्षत्रिय व व आचल अगरवाल प्रत्येकी १ बळी . महाराष्ट्र १३४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र वि वडोदरा – वडोदरा ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली .
वडोदरा १९.४ षटकांत – सर्वबाद १०९ – निधि धरमुनिया ४८ , उत्कर्षा कदम व श्वेता सावंत प्रत्येकी 2 बळी .
महाराष्ट्र – २० षटकांत ९ बाद १०७ – ईश्वरी सावकार ४६, श्वेता सावंत २८ . जानकी राठोड ३ व नृपा २ बळी. वडोदरा २ धावांनी विजयी.
सुरत येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – ११ ऑक्टोबर – दिल्ली , १४ ऑक्टोबर – कर्नाटक , १६ ऑक्टोबर – हरयाणा. १८ ऑक्टोबर – माणिपूर, २० ऑक्टोबर – हिमाचल प्रदेश , २२ ऑक्टोबर – आसाम .