झी मराठी घेऊन येत आहे एक अनोखी संगीतमय प्रेमकथा ” हृदयी प्रीत जागते”

0

मुंबई,११ ऑक्टोबर २०२२ – ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे जी एका नम्र कुटुंबातील आहे. तर नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा आहे आणि त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे. हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत ह्या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही तरुण जोडी ह्या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ह्या मालिकेचे लेखन केलं आहे अभिजीत शेंडे यांनी, तर झी मराठीवर अनेक सुपरहिट मालिका देणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे राजेश जोशी यांनी

एक अनोखी संगीतमय प्रेमकथा ” हृदयी प्रीत जागते”. ७ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वा.झी मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!