मुंबई १३ ऑक्टोबर, २०२२ – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालच्या भागात BB विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा. घरामध्ये सुरु असलेले “गेले उडत” हे साप्ताहिक कार्य काल पूर्ण झाले.आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य !
काल कॅप्टन पदासाठी मिळाले दोन उमेदवार रोहित आणि अक्षय. आज या दोघांमध्ये रंगणार आहे कॅप्टीन्सी कार्य. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्य म्हंटल म्हणजे भांडणं, मारामारी, हे आलंच. आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे बघूया आजच्या भागामध्ये.
रोहित – अपूर्वाने उडवली रुचिराची खिल्ली !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत. रोहित अपूर्वला सांगणार आहे, “हिला कधी पण काहीहि सुचतं, तू हिला नाही बेट करू शकतं. हीच अपरंपार असतं. अपूर्वाने रुचिरा समोर give up केले असे ती म्हणाली. रोहित म्हणाला, तिला भांडताना बघायचं “एक मिनिटं” मला बोलायचं आहे. अपूर्वा म्हणाली, नाही तिचं असं असतं “आता माझं ऐकायचं, आता तुम्ही ऑडियन्स बघा… सुरात बोलते, रॅप करतेस तू. काही आनंदाचे क्षण देखील आज घरात बघायला मिळणार आहेत.
बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.