नाशिक (प्रतिनिधी) : नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 22 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ६:३० वाजता ‘स्वर दीपावली’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीचा आनंद स्वरांसोबत द्विगुणित करण्यासाठी विश्वास ग्रुपतर्फे अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध गायक पंडित डॉ. अविराज तायडे, ज्ञानेश्वर कासार, मधुरा बेळे यांचे गायन होणार असून नव्या पिढीतील क्षितिजा शेवतकर (सतार) व राजेश्वरी रत्नपारखी (बासरी) यांची फ्युजन जुगलबंदी रंगणार आहे. त्यांना नितीन वारे (तबला), नितीन पवार (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) व पार्थ शर्मा (गिटार) हे साथसंगत करणार आहेत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे या करणार आहेत.
मैफिलीचे हे एकोणीसावे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, ग्रंथ तुमच्या दारी, ग्रंथ तुम्हारे द्वार यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. ऑडिओ पार्टनर, द आर्क ऑडिओ आहेत
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.