नाशिक,२९ ऑक्टोबर २०२२- सामाजिक समस्यांवर गेल्या सात वर्षांपासून कार्य करत असलेली नाशिक मधील युनाइटेड व्ही स्टॅन्ड संस्थेने माघील वर्षाप्रमाणे यंदाची दिवाळी हेधपडा त्रिंबकेश्वर येथे साजरी केली. संस्था हेधपाड्यावर माघील तीन वर्ष्यांपासून अनेक प्रकारे मदत कार्य करत आहे.
यंदाच्या दिवाळी निम्मित संस्थेने पाड्यावर जाऊन संपूर्ण गावाला दिवाळी किट वाटप केले व कपडे दिवाळी भेट म्हणून देण्यात आले. रोज डोळ्या समोर कष्ट पाहणाऱ्या मुलांना दिवाळीचा आनंद लुटता यावा म्हणून इको फ्रेंडली फटाके फोडले व युनाइटेड व्ही स्टॅन्ड संस्थेच्या संस्थेतील महिला वर्गाने शेणाने सावरलेल्या परिसरात रांगोळी काढली व सर्व घरांची सजावट करण्यात आली. एक किट मध्ये ( नवीन कपडे , साडी , दिवाळी कंदील , ५ पणती , शैक्षणिक किट , नवीन चपल , हळदी कुंकू चे किट , रांगोळी , ) असे साहित्य होते .
गावातील संपूर्ण कुटुंबाला हे किट देण्यात आले त्याच बरोबर गावचे सुशोभीकरण सुद्धा करणयात आले . संपूर्ण गाव खूप उत्साहित होते. दिवाळीचे सौंदर्य फुलून यावं आणि हा दिवस गावकऱ्यांच्या स्मरणात सदैव राहावा म्हणून दिवा आणि आकाशकंदील लावून रंगीत रोषणाई केली. हा दिवस आम्हाला कायम लक्षात राहील आणि आपण दिलेल्या दिवाळी भेटीने आमचा सण गोड केल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली, तर वृद्ध,पुरुष, महिला व लहान मुलं असा सर्व वर्गाचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केल्याचं मत संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले यांनी व्यक्त केले.
संस्था हेधपाड्यावर माघील तीन वर्ष्यांपासून अनेक प्रकारे मदत पोहचवत आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे पाण्यासाठी महिलांना रोजची कसरत करावी लागत असल्याने, त्याला पर्याय म्हणून संस्थेने चाका सारख ओढता येईल अश्या वॉटर व्हील पाण्याच्या टाक्या पूर्ण गावाला वाटण्यात आल्या होत्या ज्यामुळे गावातील मोठा प्रश्न सुटल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली होती. शाळेची सोय नसल्यामुळे त्यांना शालेयवस्तू पुरवण्यात आल्या व पत्र्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात घामात बसावं लागत असल्याची समस्या स्थानिक शिक्षकांनी सांगितल्यानंतर संस्थेने तिथे पंखा व इतर सोय करून दिली. या दिवाळी उपक्रमा प्रसंगी अंकुश चव्हाण , निलेश पवार , हिमांशू सूर्यवंशी , ओम काठे, हरीश सिंग , पियुष कर्णावट , गौरव आव्हाड , गौरव राहाणे , अक्षय गवळी , गिरीश गलांडे , शुभम जाधव तर महिलांध्ये हनी नारायणी , अश्विनी कांबळे , महेक पांडे , माधुरी कळूनघे , श्वेता मुंढे , धनश्री बोरसे , पूजा गोडसे , प्रीती पांढरे आणि व अन्य १० जण उपस्थित होते.
एक किट मध्ये नवीन कपडे , नवीन साडी , लहान मुलांसाठी शैक्षणीक किट , दिवाळी कंदील , ५ पणती , मिठाई चे बॉक्स , रांगोळी ,असे साहित्य होते. ज्या गावात साहित्य वाटप झाले ते संपूर्ण गाव सजवून दिले होते.